संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास ,मनसेच सविनय कायदेभंगआंदोलन

मुंबई : लोकल रेल्वेअभावी मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्यामुळे तातडीने लोकल रेल्वे सुरु करण्याची मागणी मनसेची आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मनसेचा सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान सरचिटणीस संदीप देशपांडेंनी रेल्वे प्रवास केला असताना तिकडे ठाणे स्टेशनवर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.आंदोलनापूर्वी मनसैनिकांना पोलिसांच्या नोटीस
मनसेच्या सविनय आंदोलनच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे. सर्व सामान्य लोकांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आज होणाऱ्या आंदोलनाआधी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी 5 हून अधिक माणसं दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. कलम 149 आणि 144 प्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था भंग केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही यात म्हटलं आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. कुठे खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर काही वेळा बस थांबवली जात नसल्याने अनेक तास वाट पाहत राहावी लागते. त्यामुळे लोकल लवकर सुरु करण्याची मागणी वारंवार केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!