सोलापूर : सोलापुरात माढा तालुक्यात टायर जाळून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकाचौकात पोलिसांचं पथक उभं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
तर पंढरपुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. माळशिरस-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 2 हजार पोलीस तैनात केले आहेत.