अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हॉल तिकिटावरच परीक्षेसाठीचे यूजर नेम व पासवर्ड राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची चेहरा पडताळणी केली जाईल. हॉल तिकीट, आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा कॉलेजचे ओळखपत्र विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अपलोड करायचे आहे.
या फोटोची साइज ‘शंभर केबी’ इतकीच असावी. विद्यापीठाने परीक्षेसाठी तयार केलेली ई-प्रणाली दोन्ही चेहरे तपासेल. त्यामुळे ओळखपत्र जोडतानाच विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी. स्पष्ट चेहरा दिसेल अशा स्वरूपात परीक्षेला बसावे, यासह विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ संपण्यापूर्वीच सबमिट बटणावर क्लिक करणे अनिवार्य आहे. एकदा सबमिट झालेला पेपर पुन्हा देता येणार नाही, या नवीन नियमांची भर विद्यापीठाने घातली आहे.
विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घ्या…
-परीक्षेवेळी वेबकॅमद्वारे फोटो काढले जातील.
-विद्यार्थ्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आल्यास ताकीद देण्यात येईल.
-विद्यार्थ्याला परीक्षा देताना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येणार नाही.
-कोणत्याही प्रकारे बोलणे, खुणा करणे, अन्यथा आजूबाजूने एखादी व्यक्ती जाणे गैर असेल.
-नियमांचे पालन न झाल्यास विद्यार्थ्याची परीक्षा त्वरित स्थगित होईल.