सोलापूर : “शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू’या उपक्रमाअंतर्गत दोन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण घरपोच दिले जात आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने अद्याप यंदाचे शैक्षणिक सत्र सुरुच झाले नाही. त्यामुळे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा लांबणीवर पडणार आहेत. दुसरीकडे राज्यातील कोरोना ससंर्ग कमी न झाल्यास उच्च महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आता दहावी- बरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घरबसल्या ऑनलाइन घेण्याचा विचार पुढे आला आहे.
शैक्षणिक सत्र लांबल्याने परीक्षेच्या वेळापत्रकास अडचणीकोरोनामुळे 2020- 21 च्या शैक्षणिक सत्राचीच सुरवातच अद्याप झालेली नाही. त्यामुळे दहावी- बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जुलै-ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा अजून झाली नाही. शैक्षणिक सत्र लांबणीवर पडल्याने फेब्रुवारी- मार्च 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकही ठरलेले नाही. कोरोनाचा संसर्ग असाच राहिल्यास नियोजन करावे लागेल. शंकुतला काळे, अध्यक्ष, पुणे बोर्ड