पुणे | देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून रूग्ण उपचारानंतर बरं होण्याच्या प्रमाणात बर्यापैकी वाढ झालेली दिलीये. दरम्यान, आयसीयूच्या विभागांमध्ये सेवा देण्यासाठी हैदराबादहून 40 प्रशिक्षित नर्सेस पुण्यात दाखल झाल्या आहेत.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “आयसीयूत सेवा देण्यासाठी हैदराबादहून ४० नर्सेस पुणे शहरात दाखल झाल्या असून या नर्सेस जम्बो रुग्णालयात कर्तव्यास असणार आहेत. यामुळे वैद्यकीय सेवासक्षम होण्यास मोठी मदत होणार असून या सर्व नर्सेसचं पुणेकरांच्या वतीने मनापासून स्वागत.”
पुणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या 24 तासात 1248 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 1658 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. पुण्यात 39 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.सध्या पुणे शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 130081 एवढी आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 109371 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. या बरं झालेल्या रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.