डॉक्टर खोसे यांच्यावर जीवघेणा हल्ला

आरोपींना तात्काळ अटक करण्याची डॉक्टर संघटनेची मागणी


बीड दि . 19 ( प्रतिनिधी ) शहरातील प्रसिद्ध डॉक्टर यशवंत खोसे यांचे चिरंजीव डॉक्टर शिरीष खोसे यांच्यावर काल रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता शुल्लक कारणावरून काल रात्री तीनच्या सुमारास यांच्यावर इतका जीवघेणा हल्ला केला की, डॉक्टर खोसे ते बेशुद्ध पडले होते त्यानंतर त्यांना उपचारासाठी बीड येथे आणण्यात आले. डॉक्टर खोसे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध पूर्ण डॉक्टर संघटनेच्यावतीने करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.


  बीड शहरातील प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ म्हणून डॉक्टर खोसे सर्वपरिचित आहेत. मागील काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयात ते कोविड रुग्णांना उपचार देत आहेत. नवगण राजुरी परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपावर कार्ड कारणावरून पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी आणि डॉक्टर खोसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली यानंतर डॉक्टर खोसे  यांना अमानुषपणे मारहाण सदरील पेट्रोल पंपावर करण्यात आली. दरम्यान त्यांच्या खिशात असलेले पैसे आणि मौल्यवान दागिने देखील चोरीस गेल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. डॉक्टर खोसे यांना इतक्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली की त्यांना बीड येथे आणताना शुद्ध देखील राहिली नव्हती. डॉक्टर खोसे यांच्यावर बीड येथील काकू नाना हॉस्पिटल आणि मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट येथे उपचार चालू आहे. दरम्यान डॉक्टर खोसे यांना तर मारहाण झाली परंतु त्यांच्या गाडीचे देखील मोठे नुकसान पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!