मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूडवर पण ती दरवेळेस कोणत्याना कोणत्याना कारणांने आरोप करत असते.आज काळ चाललेल्या गोष्टी वरून कलाकार आता कंगनावर बंदी घालणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. या चर्चेवरुन चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली.
विक्रम भट्ट म्हणतात
‘कंगनावर बंदी घालणं अशक्य आहे, तिला काम तर द्यावंच लागेल’, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. माध्यमांशी बोलताना एका मुलाखतीत विक्रम भट्ट यांनी कंगना वादावर भाष्य केलं. ‘कंगना रनौट एक उत्तम अभिनेत्री आहे. कुठलीही व्यक्तिरेखा साकारताना ती सखोल अभ्यास करते. निर्मात्यांना अशा महत्त्वाकांक्षी कलाकारांसोबत काम करायला आवडतं. त्यामुळे केवळ राजकीय मतभेदांमुळे कंगनावर बंदी वगैरे घालणार नाही. शिवाय कंगना एक नामांकित अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट चालण्यासाठी कुठल्याही बॅनरची गरज नाही. ती स्वत: देखील चांगल्या चित्रपटांची निर्मिती करु शकते’, अशी प्रतिक्रिया भट्ट यांनी दिली.