नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 51,18,254 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 97,894 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1,132 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.