मुंबई, दि.16 : महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने डॉक्टरांशी चर्चा केली. तपासणी केली असता मला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा”.