मुंबईच्या संघात अनेक दिग्गज खेळाडू असून याच संघात असलेला बीडच्या अंबाजोगाई येथील एक खेळाडू यंदा आयपीएल गाजवताना दिसणार आहे. या खेळाडूचे नाव आहे दिग्विजय देशमुख. इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 13 वा मोसम यंदा यूएईमध्ये खेळला जाणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. सलामीचा सामना चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघात रंगणार आहे.
हे वाचा : भाजपचे खासदार उदयनराजेही विरोधात उतरले,कांद्यावरून सरकारचा वांधा
दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्सकडून खेळणार, सुशांतसोबत (Sushant Sing Rajput) चित्रपटातही केले काम. गेल्या वर्षी झालेल्या लिलाव प्रक्रियेदरम्यान मुंबई इंडियन्सने दिग्विजय देशमुख (Digvijay Deshmukh) याच्यावर बोली लावत त्याला संघात घेतले. 21 वर्षीय दिग्विजय याने प्रथम श्रेणीचा एक सामना आणि टी-20 च्या लढती खेळल्या आहेत. लिलावात दिग्विजय याची बेस प्राईस 20 लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राईसला खरेदी केले.
विशेष म्हणजे दिग्विजयने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. २०१३ साली आलेल्या काय पो छे’ चित्रपटामध्ये अली नावाच्या बालकलाकाराची भूमिका दिग्विजयने केली होती. अलीची भूमिका या चित्रपटात महत्त्वाची होती. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, अमित साध आणि राजकुमार राव सारख्या कलाकारांचा समावेश होता. दरम्यान, दिग्विजय हा उजव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत १०४ धावा केल्या असून १५ विकेटही घेतल्या आहेत. मुळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असलेल्या दिग्विजयने मागील हंगामात महाराष्ट्रकडून पदार्पण केले होते. जम्मू-कश्मीरविरोधात खेळताना त्याने ६१ धावा केल्या होत्या.
दरम्यान, दिग्विजय हा उजव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत 104 धावा केल्या असून 15 विकेटही घेतल्या आहेत. मुळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असलेल्या दिग्विजयने मागील हंगामात महाराष्ट्रकडून पदार्पण केले होते. जम्मू-कश्मीरविरोधात खेळताना त्याने 61 धावा केल्या होत्या.
कोण आहे दिग्विजय
बीड (Beed) जिल्ह्यातील आंबेजोगाईत जन्मलेल्या दिग्विजयचे वडील शिक्षक आहेत. इतर अनेक सामान्य माणसांसारखे दिग्विजयने देखील क्रिकेटपटू व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला एका क्लबमध्ये दाखल केले. तो, मुंबईत १४ वर्षाखालील स्पर्धेत खेळत असताना अचानकपणे त्याला चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली. लहानग्या दिग्विजयने होकार देत काय पो छे मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारत सर्वांची मने जिंकली. अभिनय व क्रिकेट याविषयी दिग्विजयला विचारले असता तो म्हणाला, अभिनय माझी पहिली आवड कधीच नव्हती. काय पो छे नंतर मला अनेक मालिका व चित्रपटांचे प्रस्ताव आले मात्र मी ते स्वीकारले नाहीत. मला पहिल्यापासून क्रिकेटपटू व्हायचे होते. या सर्वात माझ्या घरच्यांचा मला खूप पाठिंबा मिळाला.
चित्रपटात काम केल्यानंतरही दिग्विजयने क्रिकेट न सोडता अधिक जोमाने सरावाला सुरुवात केली. आपल्या क्लबसाठी खेळताना त्याने महाराष्ट्राच्या युवा संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. कूच बिहार ट्रॉफी तसेच विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये शानदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाच्या दिशेने आपली पावले टाकली. सी.के.नायडू करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दिग्विजयला वरिष्ठ संघात स्थान मिळाले. तो सातत्याने १३०-१३५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो तसेच दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची त्याची क्षमता आहे. गोलंदाजी सोबत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत तो आक्रमक फटकेबाजी देखील करू शकतो. आपल्या कामगिरीचे श्रेय तो महाराष्ट्रचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांना देतो.