ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश,भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण

मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता राज्यातील वातावरण आणखीनच तापू लागले आहे. एका कार्टूनच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. मात्र, आता याच मुद्द्यावर अडचण वाढत असल्याचे पाहून शिवसेनेने 2016चा मुद्दा उकरून काढला आहे. यात भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकावर हल्ला केला होता. यासंदर्भात आता राज्यातील शिवसेना अथवा ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता.तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही.यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.”

याच बरोबर, “२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!