आता कंगना वादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची उडी

अयोध्या : अभिनेत्री कंगना रानौत विरुद्ध शिवसेना वादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनीही उडी घेतलीय. चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन केलंय. ‘कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापासून रोखू शकेल’ अशा शब्दांत चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत विरोध करणाऱ्यांना लक्ष्य केलंय.
गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि कंगना रानौत यांच्यातील शाब्दिक चकमक जोरदारपणे रंगली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आव्हान देताना कंगना रानौतनं ‘मुंबईत येतेय, ज्याच्यात हिंमत असेल त्यानं रोखून दाखवावं’ असं म्हटलं होतं. परंतु, कंगना रानौत मुंबईत दाखल होण्यापूर्वीच तिच्या घर वजा कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं हातोडा मारला. यानंतर उद्धव ठाकरे सरकारवर अनेकांनी टीका केली.

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांत विश्व हिंदू परिषदेचा तसंच अयोध्येतील काही साधु-संतांचाही समावेश होता. परंतु, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेत.हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगनाचं कार्यालय उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच ‘यापुढे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अयोध्येत कोणतंही स्वागत होणार नाही. यापुढे इथे आलेच तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अयोध्येतील संतांच्या विरोधाचा सामना करावा लागेल’ असा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला होता.

मात्र, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्याची कुणात हिंमत आहे? असं म्हणत विरोधकांना आव्हान दिलंय. ‘कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत… कुणाच्या आईनं इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला जन्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल. अयोध्येत असं कोण आहे, ज्याच्या आईनं इतके जिरे खाल्यानं अशा संतानानं जन्म घेतलाय की तो अयोध्येत उद्धव ठाकरेंना येण्यापासून रोखू शकेल’ अशा शब्दांत चंपत राय यांनी आपण उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय. यानिमित्तानं अयोध्येतील संतांची मतमतांतरेही समोर आली आहेत.

देशातील १० हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची चीनकडून हेरगिरी,राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!