मुंबई: शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने कार्यालयावर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना राणावत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे मी माझी कैफियत मांडली आहे. माझ्यावर अन्याय झाला असून राज्यपालांनीही माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे, असं कंगना राणावतने सांगितलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सुमारे २० मिनिटं चर्चा केल्यानंतर कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपालांना भेटून मी माझी कैफियत मांडली आहे. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने मला वागणूक दिली गेली. त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांनी दिली आहे. राज्यपालांनीही मुलीप्रमाणे माझं म्हणणं ऐकून घेतलं असून मला अश्वस्त केलं आहे, असं कंगनाने सांगित.
माझ्यावर अन्याय झाला असून त्याची कैफियत मी राज्यपालांकडे माडंली. राज्यपालांनीही माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे, असं कंगना राणावतने (kangana ranaut) सांगितलं. कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची भेट घेतली. त्यानंतर तिने मीडियाशी संवाद साधला.