बीड दि.11 (प्रतिनिधी):- शहरातील रामतीर्थ भागातील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई तुळशीराम घुमरे यांचे गुरूवार दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी आकस्मित निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवार गुरूवारी दुपारी रामतीर्थ परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती लक्ष्मीबाई यांचा दशक्रियाविधी शनिवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.
श्रीमती लक्ष्मीबाई जुन्या पिढीतील भाविक, प्रेमळ आणि कुटूंबवत्सल म्हणून सुपरिचित होत्या. बांधकाम व्यावसायात नाव असलेले बबन घुमरे व बाळु घुमरे, मिस्त्री यांच्या त्या आई होत. श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या पश्च्यात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.