हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान; शिवसेनेचा विरोधकांवर टीका

This is the biggest insult to Ambedkar

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेनेचा सुरू असलेला वाद अद्यापगी शमलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे कंगना राणावतला सपोर्ट करण्यासाठी मुबंई विमानतळवर गेले होते. त्यावरून शिवसेनेने आज समानामधून टीका केली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान आहे, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते, असं म्हणत शिवसेनेनं यावर टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!