‘यापूर्वी असा पाऊस मुंबईत कधीही पाहिला नाही’ आदित्य ठाकरेंकडून मुंबईतील पावसाळी परिस्थितीची पाहणी

मुंबई: Aditya thakare पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील पावसाळी परिस्थितीची पाहणी केली. मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर आदित्य ठाकरेंनी आज काही ठिकाणांना भेटी देत पाहणी केली आहे. तसेच यापूर्वी असा पाऊस मुंबईत कधीच पाहिला नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

मुंबईत काल 8 तासांमध्ये 330 मिमी पाऊस पडला. तर एक दिवसापूर्वी 107 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. यापूर्वी असा पाऊस कधीच पाहिला नाही. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी पावसा विषयी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वतोपरी मदत करत आहेत. ते चोवीस तास रस्त्यावर उभे राहत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान मंगळवारपासून मुंबईत सतत पाऊस पडत आहे. यामुळे संपूर्ण शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अद्याप पावसाचा रेड अलर्ट आहे. मदत व बचावासाठी महाराष्ट्रात 20 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबईत 5 टीम काम करत आहेत. लोकांनी आज घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुंबईतील पावसाचा अनुभव: तीन तास पावसात अडकलेल्या या मंत्रांनी सांगितलं त्यांचा अनुभव

One thought on “‘यापूर्वी असा पाऊस मुंबईत कधीही पाहिला नाही’ आदित्य ठाकरेंकडून मुंबईतील पावसाळी परिस्थितीची पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!