Swami Agnivesh passes away
नवी दिल्ली | सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती.
स्वामी अग्निवेश याचं लीव्हर सोरायसीस या आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर उपचार चालू होते मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि वयाच्या 80 वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी अग्निवेश यांना सायंकाळी सहा वाजता हार्ट अॅकट आला. शेवटी त्यांच्या मुख्य अवयवयांनी काम करणं बंद केलं. मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वरिष्ठ डॉक्टरांचं एक पथक त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतं मात्र त्यांची प्राणज्योत आज मालवली. साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
थोडक्यात माहिती(who is Swami Agnivesh)
स्वामी अग्निवेश यांनी आर्य नावाचा पक्ष 1970 मध्ये स्थापना केला होता. स्वामींनी 1977 मध्ये हरियणाचे शिक्षणमंत्री म्हणून कार्यभार पाहिला आहे. स्वामी अग्निवेश यांनी हे बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता.
दरम्यान, 2011 साली लोकपालासाठी स्वामी अग्निवेश यांनी समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर काही मतभेद झाल्यावर त्यांनी या आंदोलनातून माघार घेत आंदोलनातून बाहेर पडले होते.