नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना रनौत अशा विविध विषयावर भाष्य केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाव घेऊन आरोप केल्यानंतर, त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशान दाखल झाला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खडसेंना बॅकफूटवर ढकललं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले…
फडणवीसांचा पलटवार , एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही,खडसेंना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनाम द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.
उच्च न्यायालायने खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं कारण नाही, आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी घरातल्या घरात मिटवू.
एकनाथ खडसेंची प्रतिउत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर, एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. खडसे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यापेक्षा जास्त मी संयमी आहे. संयम पाळला आहे पाच वर्ष झाली सहन केलं. एमआयडीसी प्रकरणात राजीनामा घेतला, तर कुठल्या कारणासाठी? एमआयडीसीची तथाकथित जी जमीन घेतली, ती एका मुस्लीम व्यक्तीची होती. २०१० पर्यंत त्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर होते, तो हे दाखवतो. २०१० नंतर इतर हक्कात एमआयडीसीचे नाव लावण्यात आले.
त्यानंतर कागदपत्रे पाहूनच ती जमीन खरेदी केली आहे, माझ्या बायकोने, जावयाने. एकनाथ खडसेने ती जमीन खरेदी केलेली नाही. जर मी ती केली असेन, तर मी त्यात दोषी आहे. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले आसतील, तर मी कसा दोषी?”
एकनाथ खडसे काय म्हणाले होते?
“माझ्याविरुद्ध जे षडयंत्र रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनी, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो” असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मी पुरावे जमा केले आहेत, मी वरिष्ठांना जाब विचारणार, असेही खडसे यांनी सांगितले. लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले. त्यावेळी खडसे बोलत होते.
संबंधित बातम्या
कंगणाच्या आईने मानले अमित शहा यांचे आभार