त्या पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते

अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सध्या नवनवीन ट्विस्ट येऊ लागले आहेत. ठाकरे सरकारमधील एका युवा मंत्र्याचा सुशांत सिंह प्रकरणात समावेश असल्याचं म्हणत विरोधी पक्ष भाजपने टीका केली आहे. अशातच अभिनेत्री नुपूर मेहताने मोठा खुलासा केला आहे.

सुशांतच्या मृत्युच्या आधी दिशा सालियनचा मृत्यु झाला होता. त्यानंतर एका आठवड्यातच सुशांतनचाही मृत्यु झाला होता. दिशाच्या मृत्युबद्दल ठोस असं कारण मिळालं नाही तर सुशांतच्या मृत्युचा तपास आता सीबीआय करत आहे.

सुशांतची मॅनेजर दिशा सालियनने आयोजित केलेल्या एका पार्टीत शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे, की सुशांतच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मात्र भाजप नेते नारायण राणे हे माझ्याकडे काही पुरावे असून ते थोड्याच दिवसात समोर आणणार असून युवा मंत्री यामध्ये सामील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!