बबिता फोगाटची कंगनाप्रकरणात ठाकरे सरकारवर टीका,महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या…

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना यांच्यामध्ये चांगलेच रण उठलेले दिसत आहे. या वादात आता भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. बबिताने यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयातील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. त्यानंतर याप्रकरणी देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने आता या प्रकरणात उडी घेतली आहे.

कंगना राणावत आणि शिवसेना यांच्या वादात आता भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. बबिताने यावेळी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली असून त्यांनी लोकशाहीची हत्या केली, असे तिने म्हटले आहे.

बबिताने याबाबत एक ट्विट केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहे. कंगना राणावतचे प्रकरण पाहता महाराष्ट्रामध्ये खुलेआम लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचे बबिताने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बबिताने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” महाराष्ट्रामध्ये काल खुलेआमपणे लोकशाहीची हत्या करण्यात आली.” बबिताचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी बबिताला या ट्विटनंतर पाठिंबाही दिला आहे, तर काही जणांनी बबितावर टीकाही केली आहे.

कंगना उद्धव ठाकरे सरकारला घाबरणार नाही, असंही तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. कंगनाबाबत बबिताने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ” उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ज्याप्रकारे कंगना राणावतचे ऑफिस तोडले आहे, त्यावरून एक गोष्ट समजते की, उद्धव ठाकरे सरकार घाबरलेली आहे. त्यांची हे वाईट विचार आता सर्व देशापुढे आले आहेत. त्यांना काय वाटतं, असं करून ते कंगनाला घाबरवतील, तिला शांत बसवतील? पण तसे होणार नाही. कारण कंगना ही घाबरणारी नाही.”

One thought on “बबिता फोगाटची कंगनाप्रकरणात ठाकरे सरकारवर टीका,महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!