उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाचा संताप

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई केली. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून जोरदार टीका केली. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं तिच्या ऑफिसमधील व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. Kangana Ranaut’s office video

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली टीका


”उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, की तुम्ही बॉलिवूड माफियासोबत मिळून माझं घर उध्वस्त करून बदला घेतला आहेस. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार तुटेल. वेळ नेमही एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,”असं कंगनानं ट्विट केलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!