Kangana Ranaut’s office demolished: कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई करत तिला बोलण्यासाठी अनावश्यक संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल.
प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार आहे. तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा ताबा आहे.
कंगना आज मुंबईत पोहोचण्याआधीच महापालिकेने तिच्या ऑफिसवर हातोडा मारायला सुरुवात केली होती. मुंबईची पीओकेशी तुलना करणे कंगना राणौतला भोवले. आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाला जोरदार दणका देत, तिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत कारवाई केली. मात्र, यावर कंगनाने पुन्हा मुंबई पीओके असल्याचे म्हणत माझे कार्यालय राम मंदिर आहे का ज्यावर बाबराने हल्ला केला, अशी टीका केली आहे.