NOKIA चा नवीन मोबाइल बाजारात येण्या अगोदरच, डिझाईन आणि फोटो लीक …

नवी दिल्लीः HMD Global ग्लोबल लवकरच आपला नवीन हँडसेट Nokia 3.4 ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. फोनला अधिकृत लाँच करण्याआधी फोनची खास माहिती, डिटेल्स , कोडनेम यासारखी माहिती समोर आली आहे. आता पुन्हा एकदा नोकिया ३.४ च्या रियर पॅनेलची डिझाईन ची माहिती उघड झाली आहे.

नोकियाचा आगामी फोन ३.४ लाँच आधीच खूप चर्चेत आहे. या फोनची माहिती वारंवार लीक होत आहे. या फोनची डिझाईन आणि फोटो संदर्भातील माहिती आता उघड झाली आहे. HMD Global लवकरच या फोनला लाँच करणार आहे.

याआधी आलेल्या एका जुन्या रिपोर्टमधून नोकिया ३.४ मध्ये पुढच्या बाजुला एक पंच होल कॅमेरा असलेला दिसत आहे. फोनच्या फ्रंटला सर्वात वरच्या भागात कोपऱ्यात एक कट आउट आहे. फोनमध्ये गुगल असिस्टेंट साठी एक वेगळे बटन दिले जावू शकते. नोकिया ३.४ मध्ये ६.५ इंचाचा एचडी रिझॉल्यूशन डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे. रियर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा, ५ मेगापिक्सलचे दोन सेन्सर दिले आहे.
स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ‘Bengal’ प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. हा फोन ३ जीबी रॅम असू शकतो. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 किंवा 460 प्रोसेसर असू शकतो. तसेच फोनमध्ये १० वॉट फास्ट चार्जिंगसोबत 4000mAh बॅटरी असू शकते.

प्रसिद्ध टिप्स्टर Evan Blass (@evleaks) ने नोकिया 3.4 चा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये नोकियाच्या अपकमिंग फोन ला ब्लू कलरमध्ये ग्रेडियंट बॅक पॅनेलसोबत पाहिले जावू शकते. फोनमध्ये रियरवर एक सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल पाहिले जावू शकते. यात तीन सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश आहे. हँडसेटमध्ये रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि नोकिया ब्रँडिंग पाहिले जावू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!