कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! हे आहेत नवीन दर

मुंबई : कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे. कोरोना चाचणीत 800 ते 600 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी आता जास्तीत जास्त दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे. कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 1200 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

याआधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना टेस्टसाठी आता जास्तीत जास्त 2800 रुपये इतका दर आकारला जात होता. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता. तर प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास 2200 रुपये दर निश्चित करण्यात आला होता.

व्यापक जागतिक संदर्भाच्या अनुषंगाने, केंद्रसरकारची धोरणे देखील सातत्याने सुधारली आत आहेत. जनतेला दिलासा देण्याच्या अनेक उपाययोजनांपैकी, एक म्हणजे देशात सर्व लोकांना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने अलीकडेच, आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करुन पहिल्यांदाच, ‘मागणीनुसार चाचणी’सुविधा देऊ केली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनाही अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी नियमांमध्ये बरीच लवचिकता आणि स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!