मुलाला वाचवण्यासाठी आईने केले जीवाचे रान

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आईनं आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं. आई (Mother) आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी अड्जस्ट करते. वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मुलाला अडचणीच्या प्रसंगातून वाचवते आणि त्याला पुन्हा लढण्यासाठी सक्षम करते. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते, आपण हे बर्‍याच वेळा ऐकले असेल आणि पाहिले असेलच. त्यातच आता एका आईने आपल्या मुलाला एका बिबट्याच्या (Leopards) जबड्यातून वाचवले.

हे वाचा : आता वोडाफोन आणि आयडिया ओळखले जाणार नव्या नावाने

दोन प्राण्यांच्या या धोकादायक लढाईचा आणि मुलाला वाचवण्यासाठी आईने केलेल्या संघर्षाचा व्हिडिओ संदीप मॉल (sandip mol) नावाच्या ट्विटर (Twitter) युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 16 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आईची ममता, आई आपल्या पिल्लासाठी काहीही करू शकते असे अनेक कॅप्शन्स या व्हिडीओमध्ये देण्याच आले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!