राज ठाकरेचा वाढीव वीज बीला मुळे ‘अदानी ग्रुप’ला इशारा…

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांवरून मनसे आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. ‘वाढीव वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अन्यथा उद्रेक होऊ जनभावनेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा राज यांनी अदानीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
अदानी समूहाचे सीईओ शर्मा यांनी राज यांच्याशी चर्चा केली. ‘करोनामुळं गेल्या काही महिन्यात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लोक अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. रोजगाराचे साधन नाही, पगार कमी झाले आहेत. हे सगळं असताना विजेची बिलं जास्त आली आहेत. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पुढील दिवसांत बिलं कमी करून दिलासा दिला नाही तर लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल, ती कोणाच्याच हातात राहणार नाही,’ हे राज ठाकरे यांनी अदानीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचं सरदेसाई म्हणाले.

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मनसेची भूमिका जाणून घेण्यासाठी अदानी समूहाचे सीईओ शर्मा यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.


मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ‘वीज कंपन्यांनी त्यांच्या बाजूने सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, लोकांना हे कारण पटणारं नाही, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. ‘वीज कंपन्या व्यवसाय करत आहेत हे मान्य असलं तरी अपवादात्मक परिस्थितीत लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. त्यांनी वाढीव वीज बिलाच्या समस्येतून लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी आमची अपेक्षा आहे. ‘आंदोलनाची वेळ आल्यास मनसे लोकांसोबत राहील,’ असंही कंपन्यांना बजावण्यात आल्याचं सरदेसाई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!