धक्कादायक ! पूर्ण परिवार कोरोनाबाधित, हॉस्पिटलच्या खर्चामुळे वडिलांची आत्महत्या…

सांगली : संपूर्ण कुटुंबाला कोरोना लागन झाल्याने हॉस्पिटलचा खर्चचा आर्थिक भार कसा उचलायचा या धास्तीने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर काही वेळात कोरोना बाधित मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या दुधगाव मध्ये हा हृदय हेलावून टाकणारा प्रकार घडला आहे.

कोरोनाशी सर्व कुटुंब कसा सामना करणार, यात आर्थिक भार कसा पेलायचा याचाही प्रश्न त्यांच्या समोर होता. या विचाराने अशोक उपाध्ये यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबातील पाच जण कोरोनाबाधित झाल्याने अशोक उपाध्ये हे अस्वस्थ होते, त्यामुळे अशोक उपाध्ये हे डिप्रेशन मध्ये गेले होते. कोरोनाशी सर्व कुटुंब कसा सामना करणार, यात आर्थिक भार कसा पेलायचा याचाही प्रश्न त्यांच्या समोर होता. या विवंचनेतुन अशोक उपाध्ये यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येमुळे कोरोना बाधित उपाध्ये कुटुंबाला मोठा धक्का बसला होता,आणि या धक्क्यातून सावरत असताना, उपाध्ये कुटुंबावर आणखी एक दुःखाचे डोंगर कोसळला. तो म्हणजे रुग्णालयात उपचार घेणारे दीपक माने (वय 34) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या दुधगाव याठिकाणी उपाध्ये कुटुंब राहते. जैन वस्ती या ठिकाणी अशोक उपाध्ये हे पंडित म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना व त्यांच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले आणि सून यांना कोरोनाची लागण झाली होती.तर कुटुंबातील लहान मुलगी मात्र निगेटिव्ह आली होती. यापैकी मुलगा दीपक उपाध्ये याचे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

उपाध्ये कुटुंबाचेकर्ते अशोक उपाध्ये यांच्या मृत्यूला 24 तासांचा अवधी होण्याआधीच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे उपाध्ये कुटुंब हादरून गेले. वडील आणि त्यानंतर मुलाचा मृत्यूच्या घटनेमुळे दुधगाव गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!