भाजपची राऊतांकडे माफीची मागणी

अहमदाबाद : शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी अहमदाबादला ‘मिनी पाकिस्तान’ म्हणत हिणवल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून (BJP) करण्यात आलाय. ‘अहमदाबादला मिनी पाकिस्तान (Pakistan) म्हणताना संजय राऊत यांनी गुजरातला (Gujrat) बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी संजय राऊत यांनी गुजरातच्या लोकांची माफी मागावी’ अशी मागणी गुजरातचे भाजपचे प्रवक्ते भरत पंड्या (Bharat Pandya) यांनी केलीय. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या वादात भाजपनं कंगनाची बाजू उचलून धरतानाच महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय.

हे वाचा : आता सुशांतचा कर्मचारी दिपेश याने रियाविरोधात दिली साक्ष …

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबद्दल (Sushant sing rajput death case) बोलतानाच कंगना रानौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. संजय राऊत यांच्या ‘मिनी पाकिस्तान’ वक्तव्यानंतर भाजपकडून आपली बाजू जाहीर करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि कंगना रानौत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय.

कंगनाच्या या वक्तव्याचा संजय राऊत आणि शिवसेनेनं (Shivsena) चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर, कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला देतानाच ‘कंगनात हिंमत असेल तर तिनं अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानशी करून दाखवावी’ असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. ‘जर त्या मुलीनं मुंबई आणि महाराष्ट्राला मिनी पाकिस्तान म्हणण्यासाठी माफी मागितली तर मी याबद्दल विचार करेन. तिच्यात एवढी हिंमत असेल तर ती अहमदाबादबद्दल हेच म्हणू शकेल का?’ असा प्रश्नही राऊत यांनी विचारला होता.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर गुजरात भाजपचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी ‘शिवसेना नेत्यांनी अहमदाबादला छोटा पाकिस्तान म्हणत गुजरातचा अपमान केलाय. यासाठी त्यांनी गुजरात, अहमदाबाद आणि अहमदाबादवासियांची माफी मागावी’ असं पंड्या यांनी म्हटलंय. ‘शिवसेनेनं गुजरात, गुजराती रहिवासी आणि नेत्यांना मत्सर, घृणा आणि द्वेषाच्या भावनेतून निशाण्यावर घेणं बंद करावं’ असंही पंड्या यांनी म्हटलंय.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू चौकशी प्रकरणात संजय राऊत आणि कंगना रानौत वादात भाजपनं कंगनाची बाजू घेतलीय. मात्र, महाराष्ट्रातल्या अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला खडे बोल सुनावलेत. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कंगनाला वाय – वर्ग श्रेणीतली सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. मुंबईत येताच कंगनाला सुरक्षा देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!