त्या व्यक्तीचे आणि एका महिलेचे नग्न फोटो माझ्याकडे होते, मी ते वरिष्ठांना दाखवले

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अत्यंत धक्कादायक आरोप करत त्यांनी याप्रकरणी आपल्याविरोधात कसं षडयंत्र रचलं गेलं, याचा खुलासा केला आहे. याच प्रकरणी बोलताना त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.

माझ्याविरोधात आरोपांचे षडयंत्र रचले गेले. हे षडयंत्र कुणी केले?, कसे केले?, त्यात कोण कोण सामील होते?, कोणत्या मंत्र्याचे पीए होते?, अंजली दमानिया यांना कोण भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत, मी हे पुरावे वरिष्ठांना दाखवणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखवले आहेत, असं खडसे म्हणाले.

तसेच एका मंत्र्याचा पीए व एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना दाखवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय काय उद्योग चालतात याची माहिती वरिष्ठांना दिल्याचं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

मी काय गुन्हा केला आहे??? असं मी वारंवार विचारत आहे. मी दोषी असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मीच विधानसभेत केली होती, याची आठवण देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी करुन दिली. एकनाथ खडसेंचा पवित्रा पाहता येत्या काळात हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!