बंजारा हॉटेल मध्ये आढळला मृतदेह

बीड दी 5 प्रितिनीधी : शहरातील बंजारा हॉटेल मध्ये  शनिवार दी. 5 रोजी आरटीओ कार्यालयातील एका एजंटचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती भेटताच बीड शहर पोलिस ठान्याचे सपोनी गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. श्रीमंत उर्फ सिरपा बन्सीधर सरवदे (वय 52 रा.पंचशिलनगर बीड) असे मयताचे नाव आहे. शहरातील बसस्थानकासमोर हॉटेल बंजारामध्येत्यांचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. शहर पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. पीएम रिपोर्ट आल्यानंतरच नेमका काय प्रकार आहे हे समोर येईल अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!