धक्कादायक: बीडमधील कोरोनाबाधितांना तब्बल १२ तासानंतर मिळाली ऍम्ब्युलन्स

बीड, 05 सप्टेंबर : कोरोना (Corona) रुग्णासंदर्भात बीड (Beed) जिल्ह्यामधील लिंबागणेशमध्ये आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा उघडकीस आला होता.  रात्री अकरा वाजता कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह आल्यानंतर तेव्हापासून फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने पाच रुग्णांना तब्बल 12 तास ताटकळत बसावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला  होता. तातडीने सूत्र हलली आणि अवघ्या अर्ध्या तासात  रुग्णाला सुविधा मिळाली. 12 तास ताटकळत उभा असलेल्या रुग्णांनी मात्र आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केला. (Beed Corona News)

हे वाचा : आता FAU-G देणार PUBG ला टक्कर …

12 तासांपासून ताटकळत बसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्णांना अर्ध्या तासात रुग्णवाहिका (Ambulance) मिळाली. धक्कादायक म्हणजे, रुग्णवाहिकेची वाट पाहून वैतागलेले 5 रुग्ण हेत गावात मुक्त संचार करत होते.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी (Beed Corona Patient) उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका फक्त सहा आहेत. त्यामुळे रुग्णांना एकत्रित हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले जाते. रुग्णवाहिका कमी असल्यामुळे जिल्ह्यातील  रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यास उशीर होत असल्याचे आरोग्य यंत्रनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या गंभीर प्रकरणाकडे कुठलाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही म्हणून देखील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!