कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करण्याचा आरोप केलाय. कुणीतरी प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. तरीही शिवसेना लोकांच्या त्रासावरील लक्ष हटवण्यासाठी मुद्दाम कंगनाच्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित
संदीप देशपांडे म्हणाले, “भाविकांच्या मंदिरात प्रवेशाला बंदी, लाखो लोक बेरोजगार आहेत, आरोग्य व्यवस्था चांगली नसल्याने हजारो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून काम करत असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. रेल्वेसेवा चालू नसल्यामुळे लोकांचे प्रवासाचे भयंकर हाल होत आहेत. या सर्व परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का? यावर विचार करायला हवा.”
मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात महाराष्ट्रभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुठे पोस्टरला जोडे मारून तर कुठे तिचे पुतळे जाळून जनतेने आपला राग व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनीही फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून कंगना राणावतला फटकारले आहे. ज्या मुंबईने तुला नाव, पैसा, प्रसिद्धी दिली त्याच मुंबईविरोधात बोलतेस… लायकी आहे का गं तुझी, अशा शब्दांत नेटकरांनी कंगना राणावतविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि ‘मुंबई पुलिस के सम्मान में, मुंबईकर मैदान में’ अशी ललकारी देत ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले.
शिसेनेच्या आंदोलनाला संदीप देशपांडे यांची टीका
कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. कंगनाच्या विरोधात शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. तिच्या फोटोला जोडे मारण्याचं आंदोलन केलं जात आहे. थोबाड फोडण्याची भाषा केली जात आहे. हा सगळा गदारोळ जाणीवपूर्वक घडवला जात असल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे.