मुंबई: कंगनाच्या या बेताल बडबडीचा काँग्रेसना जोरदार निषेध केला आहे. कंगना राणावतचा ‘बोलविता धनी’ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व भाजप (BJP) असल्याचा थेट आरोप काँग्रेसनं केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल (Mumbai Police) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
हे वाचा : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तर होणारच, शिवसेनेने विरोधकांना ठणकावले!
सुशांतसिंह प्रकरणात (Sushant Sing Death Case) बॉलिवूडमधील (Bollywood) बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत (Kangana Ranaut) ही मुंबई पोलीस व ठाकरे सरकारवर घसरली आहे. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनीही कंगनाचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी (Sachin Sawant) कंगनाला कृतघ्न ठरवता भाजपवरही तोफ डागली आहे.
सचिन सावंत यांनी एकामागोमाग एक असे तीन ट्वीट केले आहेत. कंगना राणावत हिच्या ट्विटर हँडलचं अधिकृत नाव ‘कंगना टीम’ असं आहे. त्याचा संदर्भ देत सचिन सावंत यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. (KanganaTeam) म्हणजे दुसरंतिसरं कुणी नसून कंगना + भाजपचा आयटी सेल आहे. कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व मुंबईवर (Mumbai) प्रेम करणाऱ्या सर्वांचा घोर अपमान केला आहे, असा संताप सावंत यांनी व्यक्त केला आहे.’महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
‘राम कदम यांची नार्को टेस्ट करा’
विवेक मोईत्रा (Vivek Moitra) यांच्यापासून ते राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूडशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. कदम यांची टेस्ट झाल्यास भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग (Sandip Sing) कोणाशी बोलत होता हे कळेल व भाजपाचे ड्रग माफियाशी असलेले संबंधही उघड होतील,’ असा दावा सावंत यांनी केला आहे.