फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल: ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला

नागपूर: पूर्व विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आज विदर्भात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. करोनाच्या संकटाला प्राधान्य देण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशी टीका करतानाच एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हे वाचा : चीनला केले भारतीय सैन्याने ‘चेक मेट’

राज्यात करोनाचं (Corona) संकट वाढलं आहे. करोनामुळे होणार मृत्यूदरही (Corona Death) वाढत आहे. अशावेळी राज्यातील करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र, ते करण्याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल यात गुंग झाले आहेत. करोनाच्या काळात बदल्या करणं इतकं महत्त्वाचं आहे का?, एक वर्ष बदल्या झाल्या नसत्या तर काय फरक पडला असता?, असा सवाल करतानाच राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

राज्यात करोनाचं संकट वाढलं आहे. करोनामुळे होणार मृत्यूदरही वाढत आहे. अशावेळी राज्यातील करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र, ते करण्याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल यात गुंग झाले आहेत. करोनाच्या काळात बदल्या करणं इतकं महत्त्वाचं आहे का?, एक वर्ष बदल्या झाल्या नसत्या तर काय फरक पडला असता?, असा सवाल करतानाच राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

दरम्यान, फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thakre) पत्रं लिहून मुंबईसह (Mumbai) राज्यातील करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. राज्यात आतापर्यंत ४२ लाख ११ हजार ७५२ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ८ लाख ८ हजार ३०६ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. एकूण चाचण्यांच्या १९.१९ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह तर बाकीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. राज्यात सद्यस्थितीत प्रत्यक्षात १ लाख ९८ हजार ५२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे कालच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. राज्यात करोना मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. दैनंदिन नवीन करोना बाधित रुग्णांचा आकडाही गेल्या तीन दिवसांपासून १५ हजारच्या वरच आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!