अंबादास दानवे यांच्या टीकेनंतर खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून अदा करणार नमाज

औरंगाबाद / परवानगी नसताना आज खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून अदा करणार नमाज

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळ ही बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी नाही. मात्र आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून नमाज अदा करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel) आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू होता. धार्मिक स्थळावरुन हा वाद पाहायला
मिळाला. आता आज खासदार इम्तियाज
यांनी आज औरंगाबादमधील मशिद
उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच जलील आज दुपारी शहागंज
येथील मशिद उघडून नमाज अदा करणार आहेत. यामुळे आता खैरे आणि जलील यांच्या पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो.

हे पण वाचा

बँक खाती एकापेक्षा जास्त असतील तर सावधान !

खैरे आणि जलील यांच्यात का झाला होता वाद?
नुकतंच खासदार इम्तियाज जलील यांनी खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी निवेदन देणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मोठा वाद झाला होता. यामुळे औरंगाबादमधील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होते. याच पार्श्वभूमीवर आजही शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेनेनं एमआयएमला खडसावले

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे. ‘मंदिरे उघडण्याची मागणी हा जलील यांचा
राजकीय स्टंट आहेअसं दानवे यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
यांनीही सोमवारी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले होते. त्यांना मुखदर्शनाची परवानगी देऊन लवकरच मंदिरं खुली करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

मंदिरं उघडण्याची नियमावली बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनचे
नियम तोडल्याप्रकरणी आंबेडकर यांच्यासह अनेक जणांवर पंढरपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!