3 वर्षांची चिमुरडी पतंगाला अडकून हवेत उडून गेली…. पहा काय आहे प्रकरण

ताईपई, 01 सप्टेंबर : तैवानमध्ये पतंग महोत्सव (Taiwan Kites Festival) कार्यक्रमादरम्यान एक भयंकर प्रकार घडला . याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महोत्सवादरम्यान एका मोठ्या पतंगाला एक 3 वर्षांची चिमुरडी अडकली. बघता बघता ही चिमुरडी हवेत उडी लागली. तब्बल 100 फूट उंच गेल्यानंतर लोकांच्या लक्षात आले.

महत्वाचे : Facebook, Whatsapp ची आंतरराष्ट्रीय मीडियाने केली पोलखोल दोषींवर कारवाई करा

हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलगी भला मोठा पतंग (Kite) उडवत असताना अचानक वाऱ्याबरोबर उडून गेली. 100 फूट वर गेल्यानंतर अचानक मुलीचा हात निसटला आणि ती खाली पडली. तेवढ्यात खाली उभ्या असलेल्या जमावानं तिला पकडले आणि मुलीचा जीव वाचला. मुलीला किरकोळ दुखापत झाली.

जोरदार वाऱ्यामुळे ही मुलगी उडून गेली. मात्र योग्यवेळी लोकांनी या चिमुरडीचा जीव वाचवला. हा प्रकार घडल्यानंतर तैवानमधील हिन्शू गावात प्रशासनानं पंतग महोत्सव स्थगित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!