दुबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १३व्या हंगामातील अडथळे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. करोनामुळे (Corona) आधी स्पर्धा आयोजित करण्यास विलंब झाला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी पार पाडत अखेर युएईमध्ये (UAE) १९ सप्टेंबरची तारीख निश्चित झाली. पण तेथे गेल्यानंतर ज्या गोष्टीपासून बीसीसीआय दूर जात होती किंवा स्वत:चा बचाव करत होती ती गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येत आहे. करोना व्हायरसमुळे या वर्षी भारता ऐवजी युएईमध्ये स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला. पण आता चेन्नई (Chennai) संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांना करोना झाल्याच्या धक्क्यातून अद्याप बीसीसीआय सावरले नसताना आणखी एक कोरना रुग्ण सापडला आहे.
महत्वाचे : कोरोना संदर्भात: राज्य सरकारचा मोठा निर्णय
आयपीएल स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते स्टारच्या प्रोडक्शन टीममधील एकाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. करोना झालेल्या सदस्याला सोमवारी भारतातून युएईला जायचे होते. पण त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे स्टारने उड्डाण रद्द केले.
१९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या आधीच चेन्नइ सुपर किंग्ज (chennai super kings) संघाच्या १३ जणांना कोरना झाला आहे. त्यानंतर संघ व्यवस्थापनाशी वाद झाल्याने चेन्नईचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो भारतात परतला.
आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी स्टारच्या प्रोडक्शन टीमची पहिली बॅच बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि मुंबईतून रविवारी रवाना होणार होती. पण आता स्टारने त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत थांबण्यास सांगितले आहे.
स्टारने त्यांच्या पहिल्या बॅचला ३१ ऑगस्टला युएईला पोहोचण्यास सांगितले होते. पण त्यातील एका सदस्याला करोना झाल्याने आता अन्य लोकांचा प्रवास स्थगित करण्यात आला आहे. ही पहिली बॅच युएईमध्ये गेल्यानंतर क्वारंटाइन होणार होती. आता त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी देखील वाढू शकतो. आयपीएल सुरू होण्यास ३ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे आणि बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक देखील जाहीर केले नाही. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याने या स्पर्धेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
संघ आणि प्रसारण टीमधील सदस्यांना कोरना झाल्याने आयपीएलमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अबू धाबीत मुंबई इंडियन्स (mumbai Indians) आणि चेन्नइ सुपर किंग्ज यांच्यातील पहिल्या सामन्यात देखील बदल होऊ शकतात, असे समजते