आरोग्य विषयक आणीबाणीत कायदेभंगाची भाषा अयोग्य, संजय राऊतांचा आंबेडकरांना टोला

मुंबई, 31 ऑगस्ट: राज्यातील मंदिरे बंद ठेवणं हे काही कोणी आनंदानं करत नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार टप्याटप्याने अनेक गोष्टी सुरू करत आहे. लवकरच मंदिरं, रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. विरोधी पक्षाने राज्याच्या हितासाठी संयम बाळगला तर राज्याच्या जनतेवर उपकार होतील, अशी शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासह राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शनही घेतलं, यावरून संजय राऊत यांनी तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, पंढरपूरात प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे. मला वाटतं हे चित्र सकारात्मक नाही. वारकरी समप्रयदायाशी आमची चर्चा झाली आहे. पण सोशल डिस्टंसिंग यात महत्त्वाची आहे. त्याचा पूर्णपणे आज फज्जा उडाल्याचं विठ्ठल मंदिराबाहेर दिसत आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू शकते. प्रकाश आंबेडकर संयमी नेते आहेत, कायद्याचे जाणकर आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून आरोग्य विषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची भाषा करणे म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर यांचे क्रेडिट घ्यायचा विरोधकांनी प्रयत्न केला असेल. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी त्यांनी चर्चा करावी, अशी लोकांना वेठीस धरून आंदोलन करू नये, तणाव निर्माण करू नये, असा सल्ला देखील यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपच्या आंदोलनात किती सोशल डिस्टंनिंग पाळलं ते आपण पाहिलं आहे, अशी टीका देखील संयज राऊत यांनी केली आहे.

पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासह राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, मुख्यमत्र्यांनी जनभावनेचा आदर केला आहे. राज्यात धार्मिकस्थळं लवकरच सुरू करण्यात येतील, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. त्याबद्दल त्यांचे आंबेडकर यांनी आभार मानले.

यावेळी आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांना संयम राखवा, असं आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!