बीड । बीड जिल्हा परिषद मध्ये एक जण पॉझिटिव्ह निघाला आहे. जिल्हा परिषद मधील सर्व कर्मचारांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असतांना आता शासकीय यंत्रणेतील कर्मचारीही कोरोना बाधीत होत आहे. काल जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबचा रात्री रिपोर्ट आला. यामध्ये शिक्षण विभागातील काही कर्मचारी बाधीत आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या बाधीत कर्मचार्यांच्या संपर्कात अन्य शिक्षण विभागातील कर्मचार्यांसह इतरही नागरीक आलेले आहे. त्यामुळे आज दिवसभर शिक्षण विभाग बंद आहे. आजच संपर्कात आलेल्या सर्व कर्मचार्यांना ऍन्टिजन टेस्ट करण्यात येणार आहे. या ऍन्टिजन टेस्ट मध्ये कोणी कर्मचारी जर पॉझिटिव्ह आले तर शिक्षण विभाग किती दिवस बंद ठेवायचा हा निर्णय उद्या घेतला जाईल असे जिल्हा परिषदेचे सिईओ अजित कुंभार यांनी सांगितले.
कर्मचार्यांची होणार ऍन्टिजन टेस्ट
आजच संपर्कात आलेल्या सर्व कर्मचार्यांना ऍन्टिजन टेस्ट करण्यात येणार आहे. या ऍन्टिजन टेस्ट मध्ये कोणी कर्मचारी जर पॉझिटिव्ह आले तर शिक्षण विभाग किती दिवस बंद ठेवायचा हा निर्णय उद्या घेतला जाईल असे जिल्हा परिषदेचे सिईओ अजित कुंभार यांनी रिपोर्टरशी बोलतांना सांगितले.