मुंबई – राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरामधून भाजपवर हल्ला चढवला आहे. अनेक उद्योगपतींना मोदींचे सरकार (Modi Sarkar) नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवीत असल्याचे आरोप ते करीत आहेत. असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. काँग्रेसच्या अध्यपदावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांसह भाजपवर आसूड ओढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हे वाचा : उद्धवा, अजब तुझे सरकार; राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर टीका
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) रुग्णालयात असताना फक्त पत्र पाठवूनच काँग्रेसचे २३ नेते थांबले नाहीत, तर त्यानंतर आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली अशी विचारणा करणारी दोन ‘रिमाइंडर्स’ म्हणजे स्मरणपत्रे पाठवली. हे जरा अतिच झाले. या पत्रांमुळे सोनिया गांधी वैतागून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व आता तुम्हीच काँग्रेस सांभाळा असे सांगतील असा या ‘पत्रलेखक’ नेत्यांचा डाव होता. तो राहुल गांधी यांनी उधळून लावला आहे. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते. पंतप्रधान मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरामधून भाजपवर हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करीत आहेत. अनेक उद्योगपतींना मोदींचे सरकार नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवीत असल्याचे आरोप ते करीत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘कॉर्पोरेट’ लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला. सोनिया, प्रियांका, राहुल यांनी काँग्रेसच्या सक्रिय कार्यातून दूर व्हावे व ‘मार्गदर्शक’ मंडळाचे सभासद म्हणून काम करावे असे या सर्व मंडळींचे डावपेच होते. ते सफल झाले नाहीत, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.