आज राजधानी लखनऊच्या पॉश भागातील (Lucknow Double Murder) रेल्वेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात डबल मर्डर झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कदायाक म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे.
रेल्वे वरिष्ठ अधिकारी (आयआरटीएस) आरडी बाजपेयी (RD Bajpai) यांच्या निवासस्थानी गुन्हेगारांनी घुसून त्यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यामुळे लखनऊमध्ये खळबळ उडाली असून बंगल्याच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. लखनऊचे डीजीपी हितेश चंद्र अवस्थीदेखील घटनास्थळी पाहणी करत आहेत.
तत्पूर्वी पोलीस आयुक्त सुजीत पांडे हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी रेल्वेच्या गौतमपल्ली कॉलनीमध्ये वरिष्ठ अधिकारी आरडी बाजपेयी यांच्या पत्नीचा व मुलाचा मृतदेह सापडला आहे. दोघांनाही गोळी मारण्यात आली आहे. पाहणीवेळी ही दरोड्याची घटना दिसत नाहीय. पोलीस तपास करत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे गोतमपल्ली परिसर हा शहरातील व्हीआयपी भाग आहे. याठिकाणी मंत्री, मुख्यमंत्री, मोठमोठे सरकारी अधिकारी राहतात. मुख्यमंत्री निवासस्थान आणि राजभवनही 100 मीटरवर आहे. यामुळे येथे पावलापावलावर पोलीस तैनात असतात. एवढी सुरक्षा असताना या भागात दुहेरी हत्याकांड ते देखील बंदुकीच्या गोळ्या झाडून केल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच वाराणसीमध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते.