90% कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीराच्या या अवयवांला पोहचले नुकसान!

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे उगम स्थान असणाऱ्या चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला. आता वुहान शहरातील कोरोनावर मात करणाऱ्या 90 टक्के रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाना नुकसान पोहचले आहे. तर 5 टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

वुहान यूनिव्हर्सिटीच्या झोंगनान हॉस्पिटलमधील संचालक पेंग झियोंग यांच्या नेतृत्वाखाली एक टीम एप्रिलपासूनच कोरोनावर मात करणाऱ्या 100 रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करत आहेत. एक वर्ष चालणाऱ्या या तपासणीचा पहिला टप्पा जुलैमध्ये समाप्त झाला. पहिल्या टप्प्यातील निष्कर्षानुसार 90 टक्के रुग्णांची फुफ्फुसे अद्याप खरा स्थितीमध्येच आहे. म्हणजेच त्यांच्या फुफ्फुसातील हवेचा प्रवाह आणि गॅस विनिमयाचे काम आतापर्यंत निरोगी लोकांच्या स्तरापर्यंत पोहचलेले नाही.

या टीमने रुग्णांचे चालण्याचे देखील चाचणी केली. यात आढळले की बरे झालेले रुग्ण 6 मिनिटात केवळ 400 मीटर चालले. तर निरोगी लोकांनी एवढ्याच वेळेत 500 किमी अंतर पार केले.बिजिंग यूनिव्हर्सिटी ऑफ चायनीज मेडिसिनचे डोंगझेमिन हॉस्पिटलचे डॉक्टर लियांग टेंगशियाओ देखील बरे झालेल्या रुग्णांचा अभ्यास करत आहेत. त्यांना आढळले की बरे झालेल्या 100 रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!