काल रात्री ही चकमक सुरु झाली होती. या दहशतवाद्यांची नावे आणि ते कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत, ते अजून समजू शकलेले नाही. घटनास्थळी शोध सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी शोपियनमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले होते. काश्मीर खोऱ्यात मागच्या २४ तासात सुरक्षा दलांनी आतापर्यंत एकूण सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
Troops kill three terrorists

काश्मीर खोऱ्यातून देशविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात सैन्य दलाच्या सातत्याने मोहिमा सुरु आहेत. पुलवामातील झादुरा भागात पोलीस आणि सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.