महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले दुसरे राज्य सांभाळायला: नारायण राणेंनी केला घणाघाती आरोप

मुंबई : “महाराष्ट्र सांभाळत येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला”, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून नारायण राणेंची (Narayan Rane) हे सरकार कधी पडणार अशी भविष्यवाणी सूरूच आहे.

हे वाचा : बीडमधील मोदींच्या सभेतील भोजनाचे बिल थकले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांची राष्ट्रीय नेतृत्वाची मानसिकता असून त्यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे,असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी खोचक टोला लगावत प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे सरकारमध्ये समन्वय नाही. हे सरकार ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पडेल,असा दावा राणेंकडून करण्यात आला होता. तर सध्या सिनेक्षेत्रासह राजकारणात गाजत असलेल्या सुशांतसिंह राजपूत (Sudhant Sing Rajput) आत्महत्या प्रकरणावरून विरोधक ठाकरे सरकारवर शरसंधान साधताना दिसत आहेत.

यात नारायण राणे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार लक्ष्य करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या ट्विट मधून देखील संजय राऊत यांना प्रतिक्रिया देत थेट उद्धव ठाकरेंना टोल लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!