मुंबई|रियानं एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यात तिनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील गुन्हेगारांना राज्य सरकारमधील एक तरुण मंत्री वाचवत असल्याचा आरोप झाला. विरोधकांनी या संदर्भात आरोप केल्यानंतर पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. मात्र आपण रियाला कधीच भेटलो नसून तिच्याशी कधीही बोलणं झालं नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. यावर आता रियानं भाष्य केलं आहे. माझ्या मोबाईलमध्ये असलेला AU नावानं सेव्ह असलेला मोबाईल क्रमांक माझी मैत्रीण अनाया उदासचा आहे. तो आदित्य उद्धव यांचा असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र त्यात तथ्य नाही, असं रियानं स्पष्ट केलं.