बीड : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांनी रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांना कोंडवाड्याचा रस्ता दाखवला जात नाही, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तसेच बीड शहरात मोकाट कुत्र्यांनीही उत्साद मांडला असून काही कुत्रे पादचर्यांना चावा घेत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबतही प्रशासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त केली आहे.