मुंबई येथील नागपाडा परिसरात इमारत कोसळली ४ जण अडकल्याची शंका

मुंबई | महाडमधील इमारत दुर्घटना ताजी असताना मुंबईतही आज एका इमारतीचा भाग कोसळला आहे. मुंबईतील नागपाडा परिसरात ही दुर्घटना घडली आहे.

मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास नागपाडा भागातील एका इमरातीचा भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली 4 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात करण्यात येते. तर या दुर्घटनेत तीन जणं जखमी आहेत.

यादुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरु आहे. 3 जणं जखमी असून त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईत जुलै महिन्यात फोर्ट परिसरात इमारत कोसळली होती. त्यानंतर मालाडमध्येही मालवणी परिसरात इमारतीचा भाग कोसळला होता. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातील पाच मजली भानुशाली इमारत कोसळण्याची दुर्घटनाही घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!