मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीला धावले रोहित पवार

मुंबई |सध्या या डबेवाल्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. अशातच आमदार रोहित पवार हे डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मुंबईकर उपाशी राहू नये यासाठी अगदी घडाळ्यातील काट्याच्या वेगाप्रमाणे धावणारा म्हणजे ‘मुंबईचा डबेवाला’…मात्र कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसलाय.

आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी निधी उभा करून दिलाय. शिवाय इतर नागरिकांनाही डबेवाल्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात, “मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा.”

वादळ असो, पाऊस असो किंवा कडाक्याचं ऊन असो डबेवाल्यांकडून मुंबईकरांना नेहमी वेळेवर डबा पोहोचतो. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे अव्याहतपणे काम करणाऱ्या डबेवाल्यांची सेवा बंद आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी डबेवाल्यांना रोहित पवार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!