बीड(प्रतिनिधी):- गेल्या ५ वर्षांपासुन बीड नगरपरिषद, नगराध्यक्ष अन उपनगराध्यक्ष यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शहराची दुरवस्था झालेली आहे. एकाच कामाचे ४-५ वेळा उदघाटन करून नुसता देखावा करण्यात सत्ताधारी क्षीरसागर कुटुंबीय पुढे आहेत. शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मात्र प्रत्यक्षात काहीही काम न करणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीचा निषेध करत आज शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने यांच्या नेतृत्वाखाली चिखल पूजन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विजय सुपेकर, गणेश धोंडरे आदींसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
खड्डे, चिखलामुळे विशाल धांडेंना जीव गमवावा लागला अजून किती जीव घेणार नगरपरिषद? आहे का असा सवाल अक्षय माने यांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यावर लोकांचे मनके राहत नाहीत, हाडांचे आजार वाढले आहेत. याचे सत्ताधारी क्षीरसागर कुटुंबीयांना काहीएक देणेघेणे नसून सर्व सत्तात आपल्याच घरात ओढलेले क्षीरसागर आता निर्ढावले आहेत.शहरातील रस्त्यांची दुरावस्था हटवून ज्या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरु आहे त्या ठिकाणी तात्काळ काम सुरु करून चिखल दूर करावा यासाठी शिवसंग्रामकडून स्व शिवाजीराव धांडे नगर येथे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलपुजन आज करण्यात आले.