भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या तमाम चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. सोबतच दोघांचा फोटोही शेअर केला आहे, ज्यात अनुष्का गरोदर असल्याचं स्पष्ट दिसत आहे.